कळंब / प्रतिनिधी - 

सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंतीचे औचित्य साधून सुभाष घोडके लिखित ‘जागर कोरोना मुक्तीचा’ या पथनाटिका रुपांतरीत लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ संपन्न झाला.

कोरोना हा संसर्गजन्य रोग असून खोकणे, शिंकणे, बोलणे किंवा श्वासोच्छ्वासातून नकळत बाहेर पडणाऱ्या तुषांरातून लोकांमध्ये पसरतो.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडाला मास्क बांधणे, शारीरिक अंतर ठेवणे व हात स्वच्छ धूवणे हे साधे आणि सर्वसामान्यास परवडणारे उपाय असल्याचे या लघुपटातुन शेतकरी कुटुंबावर आलेली आपबीती चित्रित करण्यात येत आहे. हा लघुपट कोरोना सारख्या महाभयंकर रोगावर जनजागरण करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कळंब येथे प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे निर्माता दिग्दर्शक योगराज पांचाळ यांनी या वेळी सांगितले.

प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी नगरसेवक सुनिल गायकवाड, लेखक सुभाष द.घोडके लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते सतपाल बचुटे,अविनाश घोडके, माधवसिंग राजपूत यांनी पुष्पहार अर्पण करण्यात येवून अभिवादन करून चित्रीकरणास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी कलाकार देविदास भातलंवडे,इस्माईल शेख,फुलचंद काकडे,अभिषेक भातलंवडे,गणेश मते,चंद्रकांत जोंगदंड,चरणेश्वर पाटील,प्रभाकर ढवळे,सोहम ढवळे आदी हजर होते. 

 
Top