कळंब / प्रतिनिधी-

कोरोना संकटाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.लॉकडाऊनच्या काळात गरजुची उपासमार होऊ नये यासाठी शिवभोजनाची थाळी मोफत देन्याची घोषणा केली असून शहरात शिवभोजनाची मोफत थाळी सेंटर गुरुवार (ता.१५) सुरू करण्यात आले आहे.सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत थाळी सेंटर सुरू राहणार असून दररोज १२० थाळी गरजुची भूक भागविणार आहे.

ठाकरे सरकारने बुधवारपासून कडक संचारबंदी लावली आहे.अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवार (ता.१५) पोलीस निरीक्षक तानाजी दराडे,सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांच्या टीमने शहरात सकाळी फिरून संचारबंदीची माहिती नागरिकांनी दिली.कडक निर्बंधामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाल होऊ नयेत,याकरीत शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे.या निर्णयाचा तालुक्यातील दररोज १२० लाभ मिळणार आहे.गरिबांना कमी पैशात जेवण उपलब्ध व्हावे,याकरिता राज्य शासनाने मागच्या वर्षी सुरवात केली.सुरवातीला ही थाळी १० रुपयात मिळत  होती.कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व या काळात गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्रम तालुका पातळीवरही राबविण्यात आला आहे.कोरोना काळात गरजू,शेतमजूर,कामगार वर्गासह सर्वसामान्य लोकांना शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे.अशातच बुधवारी रात्रीपासून शासनाने कडक संचारबंदी लावली आहे.या दरम्यान हातावर पोट असणाऱ्याचे हाल होऊ नयेत,याकरिता शासनाने तालुका पातळीवरील शिवबभोजन थाळी सेंटरवर मोफत थाळी देण्याची घोषणा केली आहे.दररोज १२० थाळी मिळणार असून मागणी वाढल्यानंतर अन्न व पुरवठा विभागाकडे वाढीव मागणी नोंदविण्यात येऊन शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजुची भूक मागविण्यात येणार आहे. 

शिवभोजन थाळी लय भारी;

कोरोना काळात शासनाने मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडतीमध्ये कामगार म्हणून काम करत असून शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. भाजी चपाती याची चव लय भारी असल्याची प्रतिक्रिया बलभीम टेळे यांनी दिली.


 
Top