उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत असलेल्या कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संदर्भ क्र. 5 च्या आदेशातील मुद्दा क्र. 3 मध्ये नमूद अत्यावश्यक सेवा (Essential Services) व सूट दिलेल्या बाबी (Exemption Category), व मुद्दा क्र. 1 (e)(ii) नुसार जिल्ह्यातील सर्व न.प/न.पा./न.पं. हद्दीच्या क्षेत्रात व हद्दीबाहेर 10 कि.मी. अंतराचे आतील भागात असणारे सर्व पेट्रोल पंप यांना सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. 

 संदर्भ क्र. 6 च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास आदेशित करण्यात आलेले आहे.  त्याअनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलप्रमाणे कार्यवाही करणेबाबत आदेश देण्यात येत आहे.

1.सर्व किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, दुध संकलन व वितरण केंद्र, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी यांसह), कृषि अवजारे व कृषि उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, आगामी पावसाळा ऋतूच्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेल्या व्यक्ती व संस्थांकरिता अत्यावश्यक असलेल्या साहित्याची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच चालू राहतील. 

2.संदर्भ क्र. 5 च्या आदेशानुसार पूर्ण वेळ चालू ठेवण्यास मुभा दिलेल्या मुद्दा क्र. 1 व 2 मध्ये नमूद अत्यावश्यक सेवा (Essential Services) व सूट दिलेल्या बाबी (Exemption Category) वगळता उर्वरित सर्व अत्यावश्यक सेवा (Essential Services) व सूट दिलेल्या बाबी (Exemption Category) तसेच जिल्ह्यातील सर्व न.प/न.पा./न.पं. हद्दीच्या क्षेत्रात व हद्दीबाहेर 10 कि.मी. अंतराचे आतील भागात असणारे सर्व पेट्रोल पंप हे केवळ सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंतच चालू ठेवण्यास परवानगी 

3.देण्यात येत आहे. तथापि सर्व राष्ट्रीयकृत/सहकारी/खाजगी बँका, पोस्टाच्या (डाक विभागाच्या) सेवा दुपारी 2 पर्यंत नागरिकांसाठी चालू ठेवता येतील व दुपारी 2 नंतर नागरिकांसाठी या सेवा बंद करुन (प्रवेशद्वार बंद करुन) अंतर्गत कार्यालयीन कामकाज करता येईल.

 4. नागरिकांना मुद्दा क्र. 1 व 2 मधील सेवांचा लाभ घेण्यासाठी सकाळी 11 नंतर (बँका व पोस्टाच्या सेवांकरिता दुपारी 2 नंतर) बाहेर पडण्यास/संचार करण्यास मनाई राहील. परंतु संदर्भ क्र. 4 च्या मूळ आदेशातील उर्वरित इतर अत्यावश्यक सेवांची (Essential Services) व सूट देण्यात आलेल्या बाबींची (Exemption Category) कार्यालये सकाळी 11 नंतर रात्री 8 पर्यंतच्या कालावधीत नागरिकांना कार्यालयाच्या आतमध्ये प्रवेश न देता (प्रवेशद्वार बंद करुन) कार्यालयीन कामकाजासाठी चालू ठेवता येतील. (याठिकाणी काम करणा-या व्यक्तींनी कामकाज संपल्यानंतर बाहेर पडताना संबंधित विभागाने निर्गमित केलेले ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील.)

5.संदर्भ क्र. 4 च्या मूळ आदेशानुसार बंद असलेल्या सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, बाबी/उपक्रम, सेवा पूर्णवेळ बंद राहतील. तसेच संदर्भ क्र. 4 च्या मूळ आदेशातील ज्या तरतुदींमध्ये या आदेशाद्वारे बदल करण्यात आलेला नाही त्यांचेबाबत संदर्भ क्र. 4 च्या मूळ आदेशानुसार कार्यवाही करण्यात यावी.  

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

सदर आदेशाची अंमलबजावणी आज दिनांक 20/04/2021 पासून तात्काळ लागू करण्यात येत असून सदर आदेश दिनांक 01 मे 2021 रोजी सकाळी 07.00 वाजेपर्यंत लागू राहील.


 
Top