उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना विषाणुमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षकांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबास भेट घेऊन कोरोनाचा वाढता फैलाव  रोखण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी घेण्याबाबत जनजागृती मोहीम जहागिरदारवाडी येथे दि.२० एप्रिल रोजी राबविण्यात आली.

उस्मानाबाद तालुक्यातील जहागिरदारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सरपंच शशिकांत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली  व नानासाहेब पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर गावातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन घरात कोणी वयस्कर व्यक्ती किंवा तरुण व्यक्ती तसेच बालक आजारी आहे का ? याची खातरजमा करण्यात आली. कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सतत स्वच्छ पाण्याने हात धुणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे, संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करणे, स्वच्छता राखणे, शासनाने ठरवून दिलेल्या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करुन घ्यावे यासह इतर उपाययोजना कराव्यात या विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी देखील या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद दिला.


 
Top