उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

दि. ७ एप्रिल २०२१ रोजी शासनाने शिक्षक बदली सुधारीत धोरण जाहीर केले.या धोरणामध्ये एकल शिक्षकांवर प्रचंड अन्याय केल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली. सदर धोरणांमध्ये एकल शिक्षक व शिक्षिकांना सापत्न वागणूक दिली असल्याची माहिती  राज्य कोषाध्यक्ष

महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच,महाराष्ट्र प्रदेश पवन सूर्यवंशी दिली आहे. 

 या सुधारीत धोरणा मध्ये समान काम समान न्याय या तत्वाला तिलांजली देत एकलला विनंती बदलीचा अधिकार नाकारण्यात आला, सदर बदली आदेशामध्ये काहींना यथेच्छ भरभरुन दिलय तर एकल कुपोषित राहतील अशी सोय केली.

, सदर बदली आदेशात महिलांमध्येही भेदभाव केला आहे, नोकरी करतात व त्यांचे पती शेती करतात किंवा अन्य व्यवसाय करतात त्यांना माञ संधी नाहीच. दोघे नोकरी करणारे त्यांच्या गावाशेजारी किंवा शहरात राहणार. आणि एकल नोकरी करणाऱ्यांना पती किंवा कुटुंबापासून १००-१५० कि.मी.दूर डोंगराळ भागात रहावे लागणार,  एकल शिक्षकांचे कुटुंब उद्धवस्त होणार, पेसा व अवघड क्षेञात सर्वांनीच सेवा केली पाहिजे पण दोघे नोकरी करणारांची आर्थिक स्थिती भक्कम असताना व दोघे एकञ काम करु शकत असताना त्यांना अशा क्षेञात कधीच काम करावे लागणार नाही.माञ एकल शिक्षकांनीच तेथे काम करावे अशी सोय केली.

 आहे. ज्या संघटनांनी एकल शिक्षक व विस्थापित,रँडम राऊंड मधील शिक्षकांचे हक्क नाकारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले त्या संघटना भोळ्याभाभड्या एकल शिक्षकांच्या दु:खावर मीठ चोळण्यासाठी जी.आर.बाहेर आल्यावर दुरुस्ती सूचविण्याच्या पोस्ट हॉटसॅप वर टाकतात. या व अशा सर्व गोष्टीवर चर्चा करण्यात आली.

  एकल शिक्षकावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडुन न्याय मिळवून देण्यासाठी राज्य एकल मंच खंबीरपणे लढा देणार, लवकरच सदर जीआर मध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य एकल मंच मा मंत्री महोदयांना निवेदन देणार आहे. असल्याचे ही सूर्यवंशी सांगितले. 

 जिल्ह्यातील व राज्यातील सर्व एकल शिक्षक बंधू भगिनींनी इतर संघटनांचे राजीनामे देऊन आतातरी आपल्या न्याय व हक्कासाठी  एकल शिक्षक सेवा मंच ला ताकद देऊन मंचसोबत इभे रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 
Top