उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रभाव व कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे प्रा.डॉ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच आ. ज्ञानराज चौगुले यांच्यासह मी इंजेक्शन्सच्या मुबलक उपलब्धतेसाठी मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी दाेन-तीन दिवसात १० हजार व्हाईल्स उपलब्ध होतील. उपलब्ध होणारे इंजेक्शन या शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांना पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दिली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना फायदा होणार आहे, शिवाय नातेवाइकांची होणारी फरपट थांबण्यास मदत होईल.

इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन काही दिवासापासून त्यासंदर्भात सबंधित खात्याच्या मंत्र्यासमवेत चर्चा करुन हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला, जिल्ह्यासाठी दहा हजार वायल्स उपलब्ध करुन देण्याचा शब्द राज्य शासनाच्यावतीने दिला आहे. सध्या राज्यामध्येच मोठ्या प्रमाणात रेमडेसीवीर तुटवडा जाणवत असल्याने त्याच प्रमाणे जिल्ह्यात देखील तशीच स्थिती आहे. पण राज्यसरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


 
Top