उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रेमडेसिविर इंजेक्शनचा अभूतपूर्व तुटवडा लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जालना येथून ५०० रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे. यामुळे इंजेक्शनसाठी प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा तसेच उपजिल्हा रूग्णालयातील काेरोना रूग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. हे इंजेक्शन गुरुवारी रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती आमदार राणा पाटील यांनी दिली आहे.

आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून रेमडेसिवीरचा तुटवडा महाराष्ट्रभर भासत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात या औषधाची गरज असताना प्रत्यक्षात उपलब्धता अत्यंत कमी होती. शासकीय आरोग्य यंत्रणेकडे असलेला साठा संपला होता व मागणी करूनही रेमडेसिवीर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात १० हजार रेमडेसिवीरच्या व्हायल्स उपलब्ध करून दिल्याचे ट्विटरद्वारे जाहीर केले होते. त्यामुळे कालपासून राजेश टोपे व डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे उस्मानाबादला रेमडेसिवीर देण्याबाबत मागणी केली होती.


 
Top