उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक विवंचनेतून उस्मानाबाद तालुक्यातील सांजा गावातील नाभिक समाजातील मनोज झेंडे यांनी आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुःखातून सावरण्यासाठी झेंडे कुटुंबियांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून रोख आर्थिक मदत करण्यात आली. ही मदत भारतीय जनता मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. यावेळी महामंडळाचे प्रदेश संघटक किशोर राऊत, मराठवाडा  उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडीत, शहराध्यक्ष व्यंकट पवार, झेंडे कुटुंबिय तसेच  समाज बांधव व सांजा ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top