तुळजापूर / प्रतिनिधी -

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने लवकरात लवकर जास्तीत जास्त  लसीकरण होणे गरजेचे आहे, त्या मुळे लसीकरण जनजागृती वाढवण्याच्या उद्देश्यने रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्या संकल्पेनेतून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे सेल्फी पॉईंट ची सुरवात करण्यात आली. 

“मी कोविड 19 लसीकरण करुन घेतले आहे व ही लस सुरक्षित आहे” असे वाक्य लिहिलेले हे  बॅनर आहे. येथे उभे राहून फोटो काढून तो संदेश सोशल मीडिया मधून  सर्वाना मिळावा असा प्रयत्न आहे. यावेळी विशाल रोचकरी, औदुंबर कदम, किशोर साठे, राजाभाऊ देशमाने, डॉ श्रीधर जाधव, संजय देवकाते यांच्या उपस्थिती मधे उदघाटन झाले, सर्वांचे रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी आभार मानले.


 
Top