तेर / प्रतिनिधी  

 विविध मागण्यासाठी लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने 12 एप्रिल पासून ग्रामपंचायत कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातव्दारे दिला आहे.

तेर गावातील सर्व प्रश्न आणि समस्यांकडे सकारात्मक पणे लक्ष वेधण्यासाठी थांबलेले विकास कामे, दलित वस्तीतील निकृष्ट कामांची चौकशी, पाणी पुरवठा सुरळीत करावा या सर्व मागण्या सहित तेरसाठी स्वतंत्र ग्रामसेवकाची मागणी या सर्व प्रश्नांकडे सकारात्मकपणे लक्ष वेधण्यासाठी १२ एप्रिल पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार येणार असल्याचे निवेदन सरपंच, उपसरपंच यांना  देण्यात आले आहे.

निवेदनावर संभाजी कांबळे,अजय कांबळे, सचिन कसबे यांच्या स्वाक्ष-या आहेत.तसेच हे धरणे आंदोलन कोरोनाचे सर्व शासकीय निर्बंध नियम पाळत सामाजिक आंतर ठेवून, मास्क आणि सॅनीटायझरचा वापर करत, करण्यात येणार असल्याचेही या निवेदनात आवर्जून सांगण्यात आलेले आहे.


 
Top