तेर / प्रतिनिधी  

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयात अॅटीजन रॅपिड टेस्ट मध्ये कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आलेला असतानाही त्या रुग्णाला कसल्याही प्रकारच्या गोळ्या न दिल्याने तेरच्या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे असा दिसून येत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ग्रामीण भागातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून ग्रामीण रुग्णालयाची स्थापना यासाठी करण्यात आली. तीस खाटाच्या या रुग्णालयामुळे तेर व परीसरातील रुग्णाची सोय होईल या आशेने नागरिकांना प्रचंड आनंद झाला. परंतु रूग्णालयातील निष्काळजीपणामुळे रॅपिड अॅटिंजन   टेस्ट केलेल्या कोरोना रुग्णाला औषध न देताच तसेच पाठविलें. 1 एप्रिल 2021 रोजी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात    रुग्णाची अॅटीजन  रॅपिड  टेस्ट करण्यात आली .यामध्ये पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी चार  पॉझिटिव रूग्नाला कसल्याही प्रकारची ग्रामीण रुग्णालयातील औषध पुरवठा न करता  जाण्यास  सांगितले.वास्तविक पाहता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला औषध पुरवठा करणे ग्रामीण रुग्णालयाला बंधनकारक असतानाही त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला कसल्याही प्रकारच्या गोळ्या औषध देण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे कोरणा पॉझिटिव ऋग्नाबद्दल ग्रामीण रुग्णालयातील संबंधितांना किती काळजी आहे त्याचा अंदाज सर्वानाच येत आहे. 4 एप्रिलला  कोरोना पाॅजीटिव रूग्नाला फोन करून जवळच्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात औषध नेण्यासाठी पाठवा असा निरोप दूरध्दनीव्दारे रूग्नाला दिला व या रुग्णाला औषधे दिली. त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी  यानी तातडीने याची दखल घेऊन तात्काळ कारभाराची चौकशी करून कारभार सुधारणे गरजेचे आहे असे मत रुग्णांमधून व्यक्त होत आहे.


 
Top