तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीचे सभापती रेणुकाताई इंगोले उपसभापती शरद जमदाडे हे कोरोना बाधीत रुग्ण सापडत असलेल्या गावात जावुन पाहणी करुन कोरोना बाबतीत जनजागृती करीत आहेत.
शनिवारी तुळजापूर तालुक्यातील पिंपळाब्रु येथे कोरोनाचे अँक्टीव पेशंट १५ व मयत ३ तसेच गंजेवाडी येथे अँक्टीव ७ व मयत ३ या सह अनेक हायरिस्क गावांना भेट देवुन गावातील आरोग्य सुविधेची पाहणी करुन कोरोना कसा होतो यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे या संदर्भात जनजागृती करीत आहेत .
यावेळी गटविकासअधिकारी मरोड तालुका आरोग्य अधिकारी डाँ सुहास पवार जिपसदस्य राजकुमार पाटील यशवंत लोंढे पंससदस्य दत्ताञय शिंदे नारायण नन्नवरे सह गावचे सरपंचउपसरपंच ग्रामसेवक यावेळी उपस्थितीत राहत आहे.