उस्मानाबाद / प्रतिनिधी
समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स, उस्मानाबाद येथे शिवसेना पक्षाच्या वतीने व पवनराजे फाउंडेशन, नगरपालिका उस्मानाबाद व IMA च्या संयुक्त विद्यमानाने १२५ बेड्सच्या अद्ययावत जम्बो कोविड हॉस्पिटलला भेट देऊन चालू कामाची मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील , खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी केली.
या हॉस्पिटलमध्ये मध्ये 50 ऑक्सिजन बेड असून याचा फायदा कोरोना रुग्णांना होणार आहे. यावेळी कोरोना हॉस्पिटल चे तात्काळ काम पूर्ण करून हॉस्पिटल कार्यन्वित करण्याच्या सुचना केल्या.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे आदी उपस्थित होते.