उस्मानाबाद  /  प्रतिनिधी

 तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे “माझे गाव कोरोना मुक्त गाव” या आभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना कक्ष समिती स्थापन करून कोविडच्या  या महामारीत काय उपाय योजना कराव्या यांची  महिती गावकऱ्यांना देण्यात येत आहे. या मोहिमेत ,कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, तसेच मास्क, साॅनिटायझरचा वापर करावा,विनाकारण घराबाहेर पडू नये, सतत हाथ धूणे आदी बाबत जनजागृती करण्यात आली.

बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ज्योतीका चव्हाण, उपसरपंच सुर्यकांत राठोड, पोलीस पाटील  शिवाजी चव्हाण,  शिवाजी माणिक चव्हाण , अविनाश चव्हाण, अविनाश राठोड, मनोज पवार, अवि चव्हाण, महिला बचत गटाच्या राजश्री चव्हाण, मंगल राठोड, निर्मला राठोड, हॅलो मेडिकलच्या रिना चव्हाण, ग्रंथपाल रेशमा चव्हाण ग्रामविकास अधिकारी प्रशांत भोसले उपस्थित होते.


 
Top