उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासन प्रत्येक रुग्णालयाच्या संलग्नित मेडिकल दुकानात पुरवत आहे. असे असतानाही अनेक रुग्णालये संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन आणण्याची सक्त करीत आहेत. हे चुकीचे आहे. इंजेक्शन रुग्णाला पुरविण्याची जबाबदारी रुग्णालयांची आहे. यापुढे नातेवाईकांना पळविल्यास अशा रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरयांनी दिला आहे.

शुक्रवारी (दि. २४) त्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, की राज्य शासनाच्या वेळोवेळी येत असलेल्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासन पावले उचलत आहे. त्यानुसारच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांची माहिती मागवून गरजेनुसार जिल्हा प्रशासन अशा रुग्णालयांना हे इंजेक्शन पुरवत आहे. त्याची माहितीही रोजच्या रोज माध्यमांद्वारे प्रसिध्दकेली जात आहे. असे असतानाही अनेक रुग्णालये हे इंजेक्शन बाहेरून आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सक्ती करीत आहेत. असे नातेवाईक माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. वास्तविक हे इंजेक्शन प्रशासन रुग्णालयांना पुरवित आहे. सध्या बाहेर कोरोना संसर्गाचा वेग अधिक आहे. अशा वातावरणात रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी पळवू नये.. यापुढे असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.

 
Top