परंडा / प्रतिनिधी : -
तालुक्यातील कात्राबाद येथील गायरान जमिनीवरील महसूल विभागाच्या वतीने लावण्यात आलेला वृक्षांना पाणी देण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला.
कात्राबाद येथील गायरान जमिनीवर महसूल विभागाच्या वतीने 2019 मध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांना सध्या पाण्याची नितांत गरज होती.हे ओळखून गावातील माजी सरपंच सूर्यकांत बोराडे यांनी आपल्या विहिरीतील पाणी झाडांसाठी उपलब्ध करून दिले.गावातील तरुणांनी आज दिवसभर या कार्यामध्ये सहभाग घेतला.सध्या लॉकडाउन चालू आहे यामुळे सर्व तरुणांनी ही झाडे जगविण्याचा संकल्प केला. यावेळी माझी संरपच सुर्यकांत बोराडे, पोलीस पाटील महादेव मोरे,ह भ प बालाजी महाराज बोराडे , सत्यवान लोकरे ,आनंद बोराडे , बप्पा बोराडे ,महेश बोराडे ,नानासाहेब बोराडे, तुषार मोरे , आशिश बोराडे, अतुल बोराडे, ऋषिकेश बोराडे हे उपस्थित होते..