तुळजापूर / प्रतिनिधी : -   

कोरोना बाधीत व्यक्तीवर  अंत्यसंस्कार करताना तुम्हाला सवलती देतो म्हणून मयताचा नातेवाईकांना पैशाची मागणी केल्या प्रकरणी मुख्याधिकारी यांनी पैशाची लाच मागणा-या एका कर्मचा-यास  तडकाफडकी निलंबित केले. 

अंत्यसंस्कार करणा-या   शंकर कांबळे यांनी स्वःताच्या मोबाईल वरून   ५ हजाराची मागणी केली  मात्र त्या नातेवाईकाकडे  ४ हजार होते त्यांनी ते दिले. 

 उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील शेतमजूर बापू गोरख माळी या कोरोनारुग्नांवर प्रयत्न केले होते दि.२४ एप्रिल रोजी रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुळजापूर मध्ये तुटवडा असल्याने त्यांना रेमेडीसीवीर इंजेक्शन मिळाले नाही. त्यांचे दुपारी उपचारा दरम्यान तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे निधन झाले होते याची माहीती . नगर पालीकेचे मुख्याधिकारी यांनी सदरील कर्मचारी शंकर कांबळे यांना बोलवुन घेवुन जाब विचारताच त्याने पैसे घेतल्याचे कबुल केले.

 मुख्याधिकारी लोकरे यांनी तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले.सदरील कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबीत केल्याने पैसे खाणा-या  कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणुन गेले .


 
Top