तुळजापूर / प्रतिनिधी-

कोरोनाच्या दुसऱ्या   टप्यात कोरोना   प्रादुर्भाव  वाढत असल्याने नगर परिषद तुळजापूर च्या वतीने  शुक्रवार पेठ भागात भक्त निवास (कोवीड सेंटर ) सुरु केलेअसुन कोरोना रुग्णांचा वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर   पाणीटंचाई निर्माण होवु नये म्हणून सोमवारा दि.५रोजी नवीन बोअर घेण्यात आला.

तुळजापूर येथे शुक्रवार पेठ आठवडा बाजार परिसरात असणाऱ्या 124 भक्त रुमनिवास  येथे कोविड सेंन्टर निर्माण केले असुन येथे येथे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  वाढत असल्याने पाणीटंचाई निर्माण  होवु नये  सोमवारी नविन बोअर पाडण्याचा शुभारंभ  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरपरिषद अभियंता अशोक सनगले ,पाणी पुरवठा अधिकारी अर्जुन माने,महादेव शिंदे आदी उपस्थित होते.

 
Top