तुळजापूर / प्रतिनिधी-

  शहराच्या  मध्यवर्ती भागातील  घाटशिळ जवळ असणाऱ्या वैकुंठ धामातील बसण्यासाठी असलेल्या सिमेंटचा बाकड्याची अज्ञातांनी तोडफोड केल्याने तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेवुन  त्यांच्यावर  कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तिर्थक्षेञ  तुळजापूरात दोन सार्वजनिक स्मशानभूमि आहेत. यातील शहराचा मध्यवर्ती ठिकाणी घाटशिळ मंदीर लगत स्मशानभूमि असुन येथे अंत्यसंस्कारसाठी येणाऱ्या मंडळीना बसण्यासाठी माजी नगरसेवक कै विश्वास इंगळे यांच्या स्मरणार्थ नगरसेवक रणजित इंगळे यांनी सिमेंटचे सहा बाकडे येथे बसवले होते. माञ अज्ञात माथेफिरुने हे पाडुन टाकले असुन काही फोडण्याचा प्रयत्न केला पण सिमेंट चे असल्याने त्यास चिरा पडला  आहेत तरी अशा अज्ञात माथैफिरुंचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरवासियांन मधुन केली जात.

 
Top