परंडा/प्रतिनिधी : - 

तालुक्यातील मौजे भोंजा येथे बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमेश गणंगे यांच्या मार्गदर्शना खाली सिना-कोळेगाव प्रकल्प मधील पाणी कंडारी शाखा कालवा ते सोनारी, मुगांव, कार्ला, कंडारी,भोंजा, कुभेंजा, खानापूर, रोसा, जामगांव,भोञा या शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी  पीक ऊस, भुईमूग, उडीद, मुग, पपई, तुती, कलिंगड, खरबूज इत्यादी पीक करीता व  जनावरांना व पशु पक्षी, प्राण्यांना पाणी कॅनाल द्वारे सोडावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

सिना - कोळेगाव प्रकल्पा मधून कॅनॉल द्वारे पाणी सोडण्यासाठी येथील कार्यालया मधील फॉर्म नंबर ७ भरण्यासाठी शेतकर्यांनी सुरवात केलीआहे.  तसेच गेली २२ वर्षापासून अद्याप पर्यंत सिना कोळेगाव प्रकल्पात शेतकर्याच्या गेलेल्या शेत जमिनीचा मावेजा ही मिळालेला नाही व पाणी ही मिळत नसल्याने या गंभीर विषयावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पुढचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

सिना-कोळेशाव प्रकल्पातून जर पाणी न सोडल्यास शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता हरसुरे यांना काळे फासण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटना यांनी दिला आहे तसेच तीव्र आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.  

यावेळी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य चे रमेश गणंगे, उपाध्यक्ष शिवाजी औताडे, सचिव औदुंबर ठोंगे, जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल गाढवे, संघटक भिमराव जाधव, जेष्ठ नागरिक पंडित भांदुर्गे, समाजसेवक गणेश नेटके, उद्योजक विकासराव रणनवरे, शेतकरी गणपती कोंडलकर, बाबुराव हावळे, विलासर नेटके, लक्ष्मण कोळी, नवनाथ घाडगे, अंकुश भांदुर्गे, वसुदेव मदणे, बाळासाहेब नेटके, दादासाहेब मोरे, शिवाजी ननवरे, रामराजे कोळी आदी शेतकरी उपस्थित होते.


 
Top