कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कोविड 19 लस घेण्यासाठी लोकांचा कल वाढल्यामुळे सध्याच उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी लांबच- लांब रांगा लागत असल्याने 1 में पासुन राज्यात सर्वत्र वय वर्ष 18 पुढील सर्वांना लसीकरण सुरु होत आहे, या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंस पाळणे अशक्य होणार असल्याने लसीकरण केंद्राच्या संखेत वाढ करण्याची मागणी होत आहे.
कार्यालय वार्डात लसीकरण केंद्र सुरु करा -कंदले
या बाबतीत रुग्ण सेवा समिती सदस्य आनंद कंदले यांनी जिल्हाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मागणी करताना म्हटलं आहे की, शासकीय खाजगी कार्यालय हाँस्पीटल,मंगल कार्यालयसह जे नगरसेवक लसीकरण शिबीर वार्डात घेवु इछातात अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करावेत अशी मागणी केली आहे.
शहरात दोन लसीकरण केंद्र आहेत पण ते उपजिल्हारुग्णालयात आहेत
सध्या येथे लसीकरणासाठी लांबचा लांब रांगा लागत असुन सोशल डिस्टंस पाळणे शक्य होत नाही येथेच कोविड रुग्णालय असल्याने एकच गर्दी होत असल्याने उपजिल्हारुग्णालय परिसर कोरोनाचे प्रसार केंद्र बनु नये १ मे पासुन येथे प्रचंड गर्दी वाढणार असल्याने १ मे पासुन जास्तीत जास्त लसीकरण केंद्र शहरभर उघडुन होणारी गर्दी टाळावी या लसीकरण केंद्रासाठी
शहरातील इतर शासकीय कार्यालय किंवा खाजगी मंगल कार्यालय हाँस्पिटल ताब्यात घेऊन तिथे लसीकरण केंद्र सुरु करुन लस घेणाऱ्यांची गर्दी टाळावी अशी मागणी सर्वच स्तरातुन होत आहे.