तुळजापूर / प्रतिनिधी-
मायभूमी फाऊंडेशनच्या वतीने कोरोना महामारी रोखण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील दहीवाडी गावात पाचशे मास्क वाटप करण्यात आले
दहीवडी येथील भाजीपाला पुणे -मुंबई शहरात जातो शहरातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा शिरकावा येथे होवु नये यासाठी मायभूमी फांउडेशन ने गावातील बाहेर काम करणाऱ्या मंडळीना मास्कचे वाटप केले आहे.यावेळी एकुण दहिवडी गावातील 500 लोकांना मास्कचे वाटप केले. त्याचबरोबर कोरोना रोगाविषयी जनजागृती केली. मायभूमी फाऊंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कामे केली जातात. फाऊंडेशन च्या या उपक्रमाचे गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले.