कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राची माहीती 

 तुळजापूर / प्रतिनिधी- 

मराठवाडा पासुन दक्षिण तामिलनाडू पर्यत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्हयात  ढगाळ वातावरण दिसुन येत असल्याने उस्मानाबाद जिल्हयात २६ते ३० एप्रिल दरम्यान वादळ वा-यासह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवली जात असुन  या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी स्वताची व पशु धनाची काळजी घ्यावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील जिल्हा विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.

जिल्हयात वादळीवा-या सोबत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असुन त्या अनुषंगाने वेलवर्गिय भाजीपाला व नव्यानेलागवड केलेल्या आंबा, पेरु, सीताफळ बागेचे वादळीवा-या पासुन संरक्षणासाठी झाडांना काठीचा आधार द्यावा तसेच बागेभोवती वारा प्रतिरोधक झाडांची लागवाड करण्याचे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ डाँ सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

अवकाळी पावसात वीजा पडण्याची शक्यता असल्याने दामिनी अँपचा वापर करुन संभाव्य मनुष्य पशु जिवितहानी वाचवावी असे आवाहन हवामान तज्ञ नकुल हरवाडीकर यांनी केले आहे.


 
Top