तुळजापूर / प्रतिनिधी- 

लाॅकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या बेफिकिरी विरोधात पोलिस, नगरपालिका आणि महसूल कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून रूट मार्च काढला. शहरातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये शेकडो अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मात्र या नंतरही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर जबर बसणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तुळजापूर पोलिस ठाण्यातून रूट मार्चला प्रारंभ करण्यात आला. या नंतर जुने बसस्थानक, गोलाई, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भवानी रोड, महाद्वार, आर्य चौक, कमानवेस, उस्मानाबाद रोड मार्गे पोलिस ठाण्यात रूट मार्चचा समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. दिलीप टिप्परसे, मुख्याधिकारी आशिष लोकरे, पोलिस निरीक्षक मनोज राठोड, पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे, पोलिस उपनिरिक्षक सुशील चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक राहुल रोटे यांच्यासह पोलिस, नगर पालिका आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.


 
Top