तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोनाचावाढत्याप्रादुर्भाव पार्श्वभूमीवरजिल्हयातील परिस्थिती गंभीर होत असल्याने श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचा वतीने १२४भक्त निवास येथील कोरोना सेंंटर मध्ये आँक्सीजनबेड सेंट र कार्यान्वित केले जात असुन हे काम अंतिम टप्यात असुन लवकरच हे आ़ँक्सीजन बेड सेंटर जिल्हातील कोरोनाचा गंभीर रुग्णाचा सेवेत दाखल होणार आहे.या आँक्सीजनबेड सेंटर मुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विश्वस्त एस.डी.ओ योगेश खैरमाटे, आ. राणाजगजितसिंह पाटील, तहसिलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी या विश्वास्तांच्या सहकार्याने हे काम प्रशासकीय व्यवस्थापक योगिता कोल्हे करीत आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यात चर्चा होऊन २०० आँक्सीजन बेड सेंटर कार्यान्वित करण्यावर एकमत झाले होते.
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान या आँक्सीजनबेड सेंटरसाठी ३० लाख रुपये खर्च करण्याचा तयारीत आहे विशेष म्हणजे ३० लाखात १५० आँक्सीजन बेड सेंटर कार्यान्वित होवू शकते पण श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान हे धार्मिक संस्थान असल्याने साधने पुरवठा करणाऱ्या कंपनी ने कमी दरात साहित्य उपलब्ध करुन देण्यास तयार झाल्याने या ३० लाख रुपये खर्चात १६० आँक्सीजन बेड सेंटर होवु शकणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचा २०० आँक्सीजन बेड सेंटर कार्यान्वित करण्याचा मानस असुन पुढील टप्यात हे काम पुर्ण करण्यात येणार आहे. आँक्सीजन बेड सेंटरसाठी लागणारे साहित्य हरियाना, जोधापूर येथुन आणण्यात येणार आसुन हे साहित्य लवकरच दाखल होणार आहे. साहित्य मिळताच या आँक्सीजन बेड सेंटरचे काम वेगाने पुर्ण केले जाणार आहे.