तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील काक्रंबा येथील पाच अंगणवाड्यांच्या भिंती या  शिक्षण देणाऱ्या बोलक्या  भिंती बनल्या आहेत. हे काम ग्रामस्थांच्या आर्थिक  सहभागातुन करण्यात आले आहे.

माझे गाव, सुंदर गाव अभियाना अंतर्गत अंगणवाड्यांच्या  भिंतीवर  चिमुकल्यांना आवडतील अशी चिञ रेखाटले आहेत. या आकर्षक चिञ  रंगवलेल्या भिंती सध्या बालकांना शिक्षण  देण्याचे काम करीत आहेत .

या अंगणवाड्यांच्या परिसरात वृक्ष लागवाड केली असल्याने येथे निसर्गमय वातावरण बनले आहे तसेच येथे पशुपक्षी यावेत व हे पशुपक्षी चिमुकल्यांना पाहता याव्यात म्हणून येथे पक्षांची घरटे तयार केले आहेत.ते थांबावेत म्हणून त्यांच्या चारा व पाण्याची सोय केले आहे.

या उपक्रमासाठी सरपंच वर्षाताई अनिल बंडगर,  शरद कानडे, निशीगंधा पाटील, समाधान देवगुंडे,अनिल बंडगर यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांनाकडून यथाशक्ति वर्गणी जमा करुन ही रंगरंगोटी केली आहे. यासाठी रोहिणी कुलकर्णी ,कांचन गंगा मोरे, सुरैखा देवगुंडे, मंगल क्षिरसागर, निशाली बंडगर, मीरा थोरात, मीरा ढेरे, अलका दळवी ,सरस्वती सुरवसे या अंगणवाडी कार्यकत्यांनी परिश्रम घेतले आहे.


 
Top