उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील  शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने कौशल्य विकासाच्या 30 दिवसाच्या  प्रशिक्षण  शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचे उद्घाटन नूकतेच संपन्न झाले.

 निती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरसीएफ कंपनी व ऑप्टीमल कंपनी हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 30 दिवसाचे कम्प्युटर स्किल, सॉफ्ट स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इत्यादीवर 30 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आरसीएफ कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक यशवंत वाळके, ऑप्टिमल कंपनीचे पवन सर व राजीव सर ( हैद्राबाद)  हे होते.

आरसीएफ कंपनी च्या कामकाजाविषयीची माहिती कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक यशवंत वाळके यांनी दिली. आरसीएफ कंपनी समाजाच्या कल्याणासाठी नेहमीच पुढाकार घेते असे यावेळी ते म्हणाले.               ऑप्टिकल कंपनीचे पवन सर यांनी देखील तीस दिवस होणाऱ्या प्रशिक्षण शिबिराच्या  व्यवस्थापनाबद्दल ची माहिती विद्यार्थ्यांना दिली. व विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख  म्हणाले की, कौशल्य विकासाचे प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू आहेत. केंद्र सरकारचा निती आयोग मागासलेल्या भागात अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून. अशा भागातील शैक्षणिक मागासलेपण व आर्थिक मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न करते. ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत असतात परंतु आपल्या गुणवत्तेचा उपयोग या कौशल्य विकास कार्यक्रमामुळे होणार आहे असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर एखादा व्यवसाय सुरू करण्याचे कौशल्य देखील आपणाला या प्रशिक्षण  शिबिरामुळे मिळणार आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून आरसीएफ कंपनी व ऑप्टीमल कंपनी अशा संस्था समाजासाठी काम करत आहेत. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थी जेथे जाईल तेथे त्याने नाव कमवावे, सामाजिक बांधिलकीचा गुण  विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी महाविद्यालय अशा प्रकारचे उपक्रम नेहमी राबवित असते असे प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. जीवन पवार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी प्रा.मारुती लोंढे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. माधव उगिले, डॉ. संदिप देशमुख यांनी खूप परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. इंदलकर , प्रा.सर्जेराव दोलतोडे प्रा. डॉ देविदास इंगळे, वाणिज्य विभागाच्या प्रा. सुप्रिया शेटे, नारायण सकटे व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.    हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना च्या बाबतीतील नियमांचे पालन करून व सामाजिक अंतर राखून,मास्क व सॅनिटायझर चा वापर करून घेण्यात आला.

 
Top