परंडा /प्रतिनिधी : -

 देशाच्या विकासासाठी झटणारा आणि देशाला प्रगतीपथावर नेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी.जगातील सर्वात मोठा पक्ष अशी ख्याती असलेल्या भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.३० वा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे ध्वज पुजन करून भाजपा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

 भाजपा वर्धापन दिनानिमित्त कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मोफत रिक्षा सेवेचा शुभारंभ युवानेते संकेतसिंह ठाकूर यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आला.

 यावेळी संकेतसिंह ठाकूर, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष महाविर तनपुरे, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ.आनंद मोरे, नगरसेवक अन्वरभाई लुकडे, विठोबा मदने, समिर पठाण, उमाकांत गोरे, अविनाश विधाते, रामकृष्ण घोडके उपस्थित होते.


 
Top