तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामीनी  श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या तुळजापूर तालुक्यातील  पिंपळाखुर्द येथे श्री शंभु महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या  उत्तराखंड येथील केदारनाथ मंदीराची हुबेहूब प्रातिकृती श्री  शंभू महादेव देवस्थान, पिंपळा (खुर्द) येथे साकारली जात आहे. पिंपळाखुर्द ग्रामस्थांचा  लोकसहभागातून तब्बल ३ कोटी रुपये जमा करून ५५ फूट उंचीचे हे भव्य मंदिर बांधण्यात येत आहे. या मंदीराचे तीस ते चाळीस टक्के बांधकाम पुर्ण झाले असुन दीड ते दोन महिन्यात या मंदीराचे काम पुर्ण होणार आहे.

यासाठी दगड नांदेड जिल्हयातुन आणला असुन या दगडांवर घडावु आकर्षक नक्षीकाम करुन मंदीर उभारले जात आहे. पिंपळाखुर्द (ता तुळजापूर) येथे बाराशे वर्षापुर्वीचे श्रीशंभुमहादेव मंदीर होते ते जीर्ण झाल्याने गावातील लोकांनी एकञित येवुन मंदीर जिर्णाध्दार करण्याचे ठरले मग हे काम ग्रामवासियांचा सहभागातुन करण्याचा निर्णय झाला. यावेळी कुणी जागा दिली, कुणी रोख रकम दिली. सध्या चार एकरात हे भव्य दिव्य केदारनाथ सारखे हुबेहूब मंदीर उभारणी काम चालु आह. श्री तुकाराम भाऊ दत्त आश्रम पुणे यांच्या मार्गदर्शन खाली होत असुन हे काम शिवबा कंस्ट्शन करीत आहेत,महाराष्ट्रातील केदारनाथाचे हे ऐकमेव्य भव्यदिव्य मंदीर ठरण्याची शक्यता आहे.

पिंपळाखुर्द हे गाव तुळजापूर -सोलापूर रस्त्यावर असुन सोलापूर हुन येणारा भाविक  आवर्जून दर्शनार्थ येण्याची शक्यता आहे. या मंदीर उभारणी साठी ट्रस्ट अध्यक्ष विष्णू अण्णारावा  शिंदे व सचिव संजय पांडुरंग कदम सह सदस्य ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.

 
Top