तुळजापूर / प्रतिनिधी- 

 पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक  रविवार दि. ११रोजी सांयकाळी ५ वाजण्याचा सुमारास शहरात आले लगेचच श्रीतुळजाभवानी मंदीर महाद्वारा समोरून प्रथम दर्शन घेवुन नंतर रिपोर्टींग करावयाचे असल्याने महाद्वारा समोरच अधिकारी वर्गाकडुन कोरोना परिस्थितीचा आढावा  घेवुन उस्मानाबाद कडे रवाना 

सांयकाळी पाच वाजता केंद्रिय पाहणी पथकातील डाँ. शर्मा व डाँ. शेळके हे तुळजापूरला आले.आल्यानंतर प्रथम राजमाता माँ जिजाऊ  महाद्वारा समोरुन देवी दर्शन घेतले. यावेळी एसडीओ योगेश खरमाटे, तहसिलदार सौदागर तांदळे, बीडीओ प्रतापसिंह मरोड, मुख्याधिकारी अशिष लोकरे यांच्याकडुन कोरोना बाबतीतची सविस्तर माहीती घेतली. 

यावेळी त्यांनी लोकांनी स्वताहुन मास्क  घालण्यासाठी प्रवृत्त व्हावेत असे प्रयत्न करा तसेच गर्दी ठिकाणावर लक्ष ठेवुन गर्दी होवु नये यासाठी  लक्ष द्या व शोसल डिस्टंस पाळण्यासाठी जनजागृती करा यासह अनेक सुचना दिल्या. केंद्राला रिपोर्टींग करावयाचे असल्याने लगेचच उस्मानाबाद कडे रवाना झाले. 

 
Top