तुळजापूर / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील मौजे दहिवडी येथे पुर्वी पासून मराठी वर्ष आरंभ चैत्र महिन्यात शु.आश्विनी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान प्रतिवर्ष यात्रा महोत्सव साजरा केला जातो.मात्र कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सदरील यात्रा महोत्सव रद्द करण्यात येत असलेचा ठराव ग्रामपंचायतने पारीत केला आहे.

कोरोना साथीच्या आजाराची गांभीर्यता विचारात घेऊन भाविक भक्तांची श्री म्हसोबा देवावरील श्रध्दा इतकेच भावीकांच्या जिवीताची योग्य ती काळजी घेणे ह्या उद्देशाने दिनांक - १३ /०४ /२०२१ रोजी गुढीपाडवा आणि दिनांक - २१ /०४ / २०२१ रोजी रामनवमी दरम्यान श्री म्हसोबा देवाचा यात्रा महोत्सव काळात भावीकानां मंदिर प्रवेशास बंदी राहील.तरी दहिवडी गाव व परीसर आणि रोजगाराच्या शोधात बाहेरगावी असलेले व स्थालांतरीत असलेले कुटूंब/ भावीकानीं गावात होणारी गर्दि टाळून महाराष्ट्र शासन व मा.जिल्हाधिकारी यानीं दिलेल्या आदेशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी  ग्रामपंचायत तीस सहकार्य करावे,असे सरपंच सौ.रुपाली प्रशांत गाटे,ग्रामसेवक रमेश यल्लम यानीं आवाहन केले आहे.

 
Top