उस्मानाबाद / प्रतिनिधी
तालुक्यातील दारफळ येथे सरपंच तथा युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करण्यात आली.दारफळ आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत राजुरी हे देखील गाव येते त्यामुळे लस घेण्यासाठी दारफळ व राजुरी गावांतील ४५ वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त हजेरी लावली होती.
समुद्रवाणी प्राथमिक आरोग्य केंद्रास २६ एप्रिल रोजी ३०० डोस प्राप्त झाले होते. ज्यामधून दारफळ येथे आयोजित केलेल्या लसीकरनात १८१ जणांना कोरोणा प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. यापुढे दर आठवड्यातील एके दिवशी लसीच्या उपलब्धता नुसार गावामध्ये लसीकरण मोहीम राबवून गावाची वाटचाल हळूहळू कोरोनामुक्ती कडे करण्याकडे भर दिला जाईल असे श्री.भोरे यांनी सांगितले.
यावेळी सरपंच अॅड.संजय भोरे यांच्यासह अनिल जाधव, शालेय समिती अध्यक्ष किशोर घुटे,प्राथमिक आरोग्य केंद्र समुद्रवाणी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित काकडे , पोलीस पाटील सचिन जाधव, मुख्याध्यापक कांबळे सर, आरोग्य सेवक चंद्रकांत सुलाखे, आरोग्य सहायक मदन जाधव, संतोष राठोड यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींची उपस्थिती होती.