परंडा / प्रतिनिधी :-

 परंडा येथील शहरातील शाळा-महाविद्यालया सह पोलीस प्रशिक्षण केंद्र असलेले कमांडो करिअर अकॅडमी , क्रांती संगर अकॅडमी आणि युवा स्पोर्ट कबड्डी अथलंटीक्स प्रशिक्षण केंद्र सध्या लॉक डाउनमुळे बंद पडले आहेत. 

शहरामध्ये अनेक शाळा महाविद्यालय आहेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याबरोबरच राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी कमांडो करिअर अकॅडमी मध्ये आणि क्रांतीसंगर प्रशिक्षण केंद्रामध्ये  प्रशिक्षण घेत आहेत.या अकॅडमी मधून अनेक विद्यार्थी विविध विभागांमध्ये नियुक्त झाले आहेत.माजी सैनिक महावीर तनपुरे यांनी सुसज्ज असे  प्रशिक्षणाचे केंद्र उभे करून अनेक मुला-मुलींना प्रशिक्षण देत होते. लाखो रुपये खर्चून त्यांनी प्रशिक्षण केंद्र उभे केले आहे.परंतु कोरोनाच्या महामारी मुळे आणि सरकारने घेतलेल्या लॉक डाऊन निर्णयामुळे त्यांना हे प्रशिक्षण केंद्र बंद करावे लागले.अनेक विद्यार्थी आपापल्या गावी परत गेले आणि आज कमांडो करिअर अकॅडमी पूर्णपणे ओस पडली.तर दिपक ओव्हाळ यांनीही विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेसाठी व त्यांच्या गुणवत्तेसाठी अतोनात प्रयत्न करून प्रशिक्षण उभे केले परंतु त्यांनाही ते बंद करावे लागले. जोपर्यंत सरकारचा निर्णय येत नाही तोपर्यंत आता हे प्रशिक्षण केंद्र असेच बंद दिसणार.याबरोबरच शहरातील शाळा महाविद्यालय हे सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेले शाळा महाविद्यालये ओस  दिसू लागली.एकंदरीत या कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून  गेले आहे. माणसांचे पुर्णपणे जीवन  कोलमडले आहे.केवळ आपण सुरक्षित रहावे आपल्या कुटुंबासमवेत राहावे  एवढाच पर्याय समोर उभा आहे.शहरासह ग्रामीण भागातील अनेक लोकांना अनेक अडचणी येणार आहेत येत आहेत या सर्व गोष्टीचा त्रास सहन करावा लागणार आहे. यामध्ये शंका नाही आपले आरोग्य चांगले असेल तर आपण काहीही करू शकतो याच गोष्टीचा प्रत्येक जण सध्या विचार करत आहेत.


 
Top