तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विश्वाला समतेचा प्रकाश देणाऱ्या भारतरत्न  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून काक्रंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काक्रंबा येथे कोविंड लसीकरणाचा शुभारंभ ज्येष्ठ वकील  नागनाथ कानडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. 

यावेळी ते बोलताना म्हणाले की कोरोना ची परिस्थिती भयावह आहे .कोरोनाचा धोका टाळण्यासाठी काक्रंबा गावातील व परिसरातील लोकांनी तात्काळ स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. सामुदायिक आरोग्य अधिकारी श्रीमती राजश्री भिसे यांनी काक्रंबा पंचक्रोशीतील सर्व 45 वर्ष पूर्ण झालेल्या वयोगटातील सर्वांनी कोविड लस घेण्याबाबत सांगितले.

यावेळी आरोग्य सहाय्यक श्री सतीश कोळगे, आरोग्य सेविका शितल वाडकर, आरोग्य सेवक आनंद कुल कर्णी, सुभाष शिंदे, प्रकाश रेड्डी, सारिका पवार, तसेच काक्रंबा गावातील आशा कार्यकर्त्या सारिका बचाटे, वनमाला थिटे छाया स्वामी, कौशल्या गाडेकर  अनिता शिरसागर  , काक्रंबा गावचे सरपंच अनील बंडगर, (उपसरपंच)  अरविंद कानडे (ग्रामपंचायत सदस्य) उमेश पांडागळे ,उमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच प्रभाकर घोगरे, आप्पा सुरवसे ,अमोल बंडगर सहशिक्षक उमेश सुर्वे आदी उपस्थित होते.

 
Top