उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कनगरा व धुत्ता  येथे 24 तास सिंगलफेज विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विद्युत महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे ओमराजे निंबाळकर याचे पत्र ग्रामस्थांनी दिले आहे.

 जिल्हयातील मौजे कनगरा व धुत्ता  येथील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक ग्रामस्थ शेतात वास्तव्यासाठी गेले असून थ्री फेज विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर शेतातील वस्त्यांवर विद्युत पुरवठा होत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून शेतातील 24 तास सिंगलफेज विद्युतपुरवठा सुरू करणेबाबत मागणी करण्यात आली आहे.उपरोक्त गावांमध्ये 24 तास सिंगलफेज विद्युतपुरवठा करणेबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

 
Top