तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात श्री हनुमान जन्मोत्सव मोजक्याच लोकांचा उपस्थितीत धार्मिक विधी करुन साधेपणाने साजरा करण्यात आला.
तिर्थक्षेञ तुळजापूरात मोठ्या संखेने हनुमान मंदीर असुन हनुमान जन्मोत्सव पार्श्वभूमीवर भाविकांनी मंदीर मंदिर प्रवेश द्वारातुनच दर्शन घेतले. शहरातील कमानवेस मधील डुल्या मारुती जवाहार गल्लीतील हनुमान तसेच श्रीतुळजाभवानी मंदीरातील जय हनुमान या प्रमुख हनुमान मंदीरांसह अनेक हनुमान मंदीरात सकाळी पुजाअर्चा करण्यात आली नंतर हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पध्दतीने धार्मिक विधी करुन साजरा करण्यात आला. यंदा कोरोना महामारी पार्श्वभूमीवर भजन- किर्तन आदी कार्यक्रम घेण्यात आले नाहीत .