तुळजापूर / प्रतिनिधी-
साहित्यातील ध्रुवतारा म्हणून ओळखले जाणारे कुसुमाग्रज व भारतरत्न विजेते वैज्ञानिक सी .व्ही .रमण यांच्या प्रतिमांचे पूजन करुन विविध उपक्विरम घेवुन राजभाष गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिवास साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम ऑनलाईन 250 विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.कुमारी श्रेया धावारे या मुलीने मराठी भाषेचे व विज्ञानाचे महत्व यावर आपले विचार व्यक्त केले. सर्वज्ञ गोमारे व आर्यन मुरकुटे या मुलांनी रंगांची गंमत हा प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर केला. अवनी खोब्रागडे व तनवी खोब्रागडे या मुलींनी ”हवा आने दे या गाण्यावरती डान्स केला.
याप्रसंगी उपप्राचार्य एस.व्ही. स्वामी सर यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगून यामध्ये रमन इफेक्ट यावरती आपले विचार व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री के .वाय .इंगळे यांनी विज्ञानाचे फायदे सांगून मराठी भाषा संवर्धन व जतन करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी मुरकुटे व पारमी गायकवाड या मुलींनी केले. कार्यक्रमासाठी श्री एच. जी. जाधव व एस .एम .गुंड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.