उस्मानाबाद  / प्रतिनिधी

सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे.त्यात मनुष्य बळाचे प्रशिक्षण करण्याबरोबरच आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणही अत्यावश्यक आहे.त्यासाठी आरोग्य विभागात चालू असलेले येरमाळा (ता.कळंब) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी नुकतीच केली.संबंधित यंत्रणांना अशी कामे गुणवत्तापूर्ण करावीत,यासाठी सूचना त्यांनी या भेटी दरम्यान व्यक्त केली.

 कोरोना आपत्तीमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य संस्था चांगल्या होण आवश्यक आहे.त्यासाठी ग्रामीण भागातील ही कामे गुणवतापूर्ण करुन ती वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे,असे मतही त्यांनी व्यक्त केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, वैद्यकीय अधिकारी डॉ.तेलप हे ही उपस्थित होते.


 
Top