कळंब ( शिवप्रसाद बियाणी

Covid-19 व्हायरस रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कळंब नगरपालिकेच्या वतीने शहरातील व्यापारी व कामगार यांची ऑक्सी मीटर व थर्मल मीटर द्वारा तपासणी करण्यात येत आहे.

 तसेच यावेळी गंभीर आजार असणारे व्यापारी व कामगार यांचीही नोंद पथकामार्फत घेण्यात येत आहे. आत्तापर्यंत शंभर दुकाने व त्यातील अडीशे मालक व कामगार यांची तपासणी करण्यात आलेली आहे. ही मोहीम आणखी तीन दिवस चालणार आहे.

या कामासाठी पाच जणांचे पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. सदर पथकामध्ये नारायण बाकले, चव्हाण अमोल, विनोद राऊत, पठाण वाय. डब्ल्यू .कैलास काळे यांचा समावेश आहे.

 
Top