कळंब / प्रतिनिधी- 

शिराढोण येथे पंचायत समीती सदस्य राजेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  अंगणवाडी सेविकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नासीर भाई पठाण, सुधीर महाजन, युवा सेनेचे शहर प्रमुख अवधूत पाटील, अंगणवाडीच्या सुपरवायझर ताई बोराडे उपस्थित होते.

 तसेच शिराढोणसह ताडगाव, घारगाव, वाकडी, लासरा, सौंदणा, दाभा, आवाड शिरपूरा या गावातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या यावेळी अंगणवाडी ताईन कडून अंगणवाडीच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

त्याचबरोबर शासनाकडून प्रत्येक अंगणवाडी साठी नळ जोडणी साठी प्रत्येकी दहा हजार रुपये  व शौचालयासाठी यासाठी 12 हजार रुपये या योजनेबद्दल अवगत करून दिले तसेच शासनाकडून  दिला जाणारा पोषण आहार व खेळाचे साहित्य त्यांचे योग्य प्रमाणात वितरण होते का हेही बारकाईने पाहण्यात आले. याप्रसंगी अंगणवाडी सेविकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 
Top