तुळजापूर / प्रतिनिधी- 

तुळजापूर पंचायत समितीच्या सभापति व उपसभापति पदाची निवडणूक झाली. या चुरशीच्या निवडणुकीमधे सभापति पदी सौ इंगोलेताई या एक मतानी व उपसभापति शरद जमदाडे हे एक मतानी निवडून आले कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना 8 मते मिळाली व भाजपच्या उमेदवारांना 9 मते मिळाली या निवडीमुळे पून्हा एकदा तुळजापूर पंचायत समितिवार भाजपचे वर्चस्व सिद्द जाले आहे आ राणा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एड.अनिल काळे यांनी सुभेच्या देऊन सत्कार करुण अभिनंदन केले.

यावेळी भाजपचे तालुका अध्य्क्ष संतोष दादा बोबडे, दिपक आलूरे, प्रभाकर मुळे, पिंटू मुळे ,विनोद पीटू गंगने,बापू कने, विजय सिंगाड़े, वसंत वडगावे ,आनंद कंदले, अरविन्द पाटिल आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.


 
Top