उस्मानाबाद/  प्रतिनिधी :-

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद तालुक्याची कार्यकारणी वार शनिवार दि. 27/03/2021 रोजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी जाहीर केली. भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन, उस्मानाबाद येथे सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना पदाचे पत्र मा.आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.मिलिंद पाटील, सुधीर पाटील, अॅड.खंडेराव चौरे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस अॅड.नितीन भोसले, प्रदिप शिंदे, भाजुमा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष निहाल काझी, उपाध्यक्ष दत्ता सोनटक्के आदि उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, सर्व नवनियुक्त पदाधिकाज्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार व केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी केले. 


 
Top