उस्मानाबाद / प्रतिनिधी : - 

भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार‘राज्यपालां’च्या भेटीला,भाजप आ.राम कदम आयुक्तांच्या भेटीला,आठवले संसदेत,महाराष्ट्रविरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस पत्रकारपरिषेत गर्क या सर्व घटनांचा  बारकाईने विचार केला तर यावरुन सरळ सरळ लक्षात येईल की भाजपचा हा सगळा खाटाटोप 

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून सत्ता मिळवण्यासाठीच आहे व म्हणूनच राज्याचे गृहमंत्री मा.अनीलजी देशमुख यांना भाजपचे नेते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे उस्मानाबाद  जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके यांनी केला.

तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित तुळजापूर तालुका राष्ट्रवादीकाँग्रेस  वक्ता सेलच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार अत्यंत पारदर्शीपणे जनतेच्या विकासाची कामे करत आहे,केंद्र सरकार जाणूनबुजून महाराष्ट्राच्या हक्काचा हजारो कोटी जिएसटी अडवून महाराष्ट्राची  आर्थिक कोंडी करत असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा गाडा सुरळीतपणे चालवत आहे.राज्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे ही प्रा.सुशील शेळके यांनी सांगितले.

याप्रसंगी तुळजापूर तालुकाध्यक्ष श्री धैर्यशील पाटील,तुळजापूर मतदार संघाचे विधानसभा अध्यक्ष मा.गोकुळ शिंदे, तुळजापूर तालुका राष्ट्रवादीकाँग्रेस वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष श्री.ञिगुणशील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top