प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्यावतीने निवेदन देऊन केली आग्रही मागणी


परंडा / प्रतिनिधी : - 

प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना शिक्षक हिताचे प्रश्नी सातत्याने पाठपुरावा करते आहे.काही अंशी प्रश्न निकाली निघाली आहेत.बहुतांश प्रश्न रखडलेलेच आहेत.रखडलेले शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे अनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.अरविंद मोहरे व मा.उप शिक्षणाधिकारी उध्दव सांगळे  यांना प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सदरील निवेदनातून शिक्षकांचे विविध प्रश्न मांडण्यात आले.जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करून आदेश निर्गमित करावेत, जिल्हा अंतर्गत बदल्यांचे अनुषंगाने आपसी (परस्पर)आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची शासन परिपत्रकानुसार आपसी बदली जोडीदार या दोघांमधील ज्याची मुळ नेमणूक दिनांक कमी असेल ती ग्राह्य धरून सेवाज्येष्ठता यादीत तातडीने दुरुस्ती करावी, अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित झाले नंतर प्रशिक्षित शिक्षकांची वेतन श्रेणी मंजूर करावी,

बिंदुनामावली अद्यावत करून एकत्रीत  गोषवारा प्रत संघटनेला द्यावी,सन.२०१९-२० चे जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड यादी तात्काळ जाहीर करावी,प्रभारी पदाचा पदभार हा सेवा ज्येष्ठते नुसारच देण्यात यावा याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना काढावेत,

जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे मासिक वेतन दरमाहा विलंबानेच होत आहे,दरमहा १ ते ५ तारखे दरम्यान करावेत.B.SC.पात्र पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करावी.वरील सर्व विषय निवेदनात नमुद केले आहेत.

यावेळी प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top