तुळजापूर / प्रतिनिधी- 

शहरातील उस्मानाबाद रस्त्यावर असणाऱ्या   मोतीझरा तांडा  परिसरात एका  परप्रांतीय तरुणाचा  अज्ञात कारणाने  तीक्ष्ण हत्याराने  खुन करण्यात आल्याची  घटना बुधवार दि २४ रोजी सकाळी उघडकिस आली. या प्रकरणी खुन झालेला 22 व करणारे संशियीत  20 ते 22 वयोगटातील आहेत.सदरील खुनाची घटना मंगळवार दि.२३रोजी राञी घडली. या प्रकरणी दोन  संशियत ताब्यात घेतला असुन अन्य एक   फरार असल्याचे समजते.सदरील संशियत आरोपी स्थानिक आहेत.

  या बाबतीत अधिक माहीती अशी की,  राजस्थान  येथील फरशी कारागिर सुभाष उर्फ बालवीर दयाल मेघवाल व 22हा शहरात फरशी बसवण्याचे काम करीत होता शहरातील सिध्दार्थ गायकवाड व त्याचे मिञ  शहरातील उस्मानाबाद रस्त्यावर असणाऱ्या मोतीझरा तांडा येथील मोकळ्या मैदानात मंगळवार राञी तिघे जण दारु पित बसले असता बोलता बोलता  चर्चा सुरु झाली यातुन शाब्दीक चकमक होवुनवाद झाला  यात सुभाष चा तीक्ष्ण हत्याराने खुन करण्यात आला.मयत हा राजस्थान राज्यातील पुटीहीतोकाबा ता नावासी जी नागोर येथील आहे.

बुधवार दि. २४रोजी ही घटना उघडकिस येताच उपविभागीय पोलिस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले  असता तिथे दारुची बाटली सापडली तात्काळ पोलिसांनी चौकशी सुरु करुन सिध्दार्थ गायकवाड ला सकाळी साडेनऊ वाजता ताब्यात घेतले  दुसरा संशीयत सांयकाळी पाच वाजता ताब्यात   घेतला  पोलिसांनी घटना स्थळी प्लूटो डाँग पथक मागवले असता कुञ्याला सापडलेल्या दारुचा बाटली चा वास दिला असता पकडलेल्या संशियत पैकी ऐकाचा अंगावर धाव घेताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले सध्या या प्रकरणी दोघा संशियत सिध्दार्थ गायकवाड व शुभम जाधव  रा तुळजापूर यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलिसांनी 302कलमान्वाय गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पो. नि मनोज राठोड हे करीत आहेत . 
Top