तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील 12 अंगणवाड्याचा लूक बदलला असून दत्तात्रय मुळे यांच्या दातृत्वातून रंगरंगोटी व बोलके चित्र काढल्यामुळे  अंगणवाड्याचे रुपडे बदलले आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या मार्गदर्शनाखाली  तेर ग्रामपंचायत मध्ये  माझ  गाव सुंदर गाव अभियानाबाबत सरपंच नवनाथ नाईकवाडी, ग्रामविकास अधिकारी प्रशात नाईकवाडी, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,मदतनीस,  आशा स्वंयसेविका यांच्या झालेल्या बैठकीत हे अभियान सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गंत तेर येथे 14 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 12 अंगणवाडीची इमांंरती सुस्थितीत आहेत .शासनाच्या माझ गाव सुंदर गाव अभियानांतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने  विविध . उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकसहभागातून अंगणवाड्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेर येथील दत्तात्रय मुळे यांनी तेरमधील  सर्व अंगणवाडीचे रंगरंगोटी करून आकर्षक निसर्ग चित्र काढून देण्याचा मनोदय जाहीर केला.बहुतांश आंगणवाडीचे . रंगरंगोटी चे काम पुर्ण केले आहे.नवनवीन योजनेच्या माध्यमातून बालकांना संस्कारक्षम अस शिक्षण  अंगणवाड्यामधून दिल जात आहे.0 ते  6 वयोगटातील मुलांना अंगणवाडीत आल्यानंतर  मन प्रसन्न व्हावे या भावनेने मुळे दांपत्याने गावातील 12 अंगणवाडीमध्ये रंगरंगोटी सोबतच भिंतीवर  निसर्ग चित्र काढून भिंती बोलक्या करण्याचा प्रयत्न केला  आहे.

तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्याची इमारतीची  परिस्थिती फारशी चांगली नाही. अनेक वाड्या वस्त्या तांड्यावर बालकांना अडचणीचा सामना करीत धडे गिरवावे लागतात.समाजात अनेक दानशूर आहेत. लोकसहभागातून हे होऊ शकते. तेरमधील सर्व अंगणवाड्याचा कायापालट दत्तात्रय मुळे व उषाताई मुळे या दांपत्याच्या दातृत्वातून होत आहे. समाजातील इतर घटकांनी ही याचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे.

 
Top