उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी क्षयरोगास कारण ठरणारा मायक्रो मायक्रोबॅक्टेरियल ट्यूबर्क्युलोसिस या जंतू चा शोध लावला म्हणून 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.या दिनानिमित्त आज जिल्हा क्षयरोग दुरीकरण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या अध्यक्षते खाली जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम करण्यात आला.

 दीप प्रज्वलन करून क्षयरोगाच्या जंतूचे संशोधक डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  डी. के. पाटील,  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर. के. अन्सारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक होळे, मेट्रन नलिनी दलभंजन आणि जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा क्षयरोग केंद्र, तालुकास्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात  हा दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त 23 मार्च 2021 रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण आज करण्यात आले. तसेच येथील जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्यामार्फत कोविडं 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी  क्षयरोगाचा संदेश असलेले मास्क शहरी भागात वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच क्षयरुग्णांना प्रोटीन पावडर, मास्क, मल्टी विटामिनच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. जिल्ह्यातील दोन चॅम्पियन यांनी टिबी मुक्त उस्मानाबाद करण्यासाठी सामाजिक भीती न बाळगता तात्काळ संशयितांनी क्षयरोगाची तपासणी करून औषध उपचार पूर्ण करावा, असे मत व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  डी. के. पाटील,  जिल्हा क्षयरोग अधिकारी  डॉ. आर. के. अन्सारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे  अभिनंदन केले.

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी टीबी नोटीफिकेशन करावे,असे आव्हान केले तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी क्षयरोगाचे उच्चाटनासाठी सर्वांना जास्तीत जास्त प्रयत्न करावेत,असे आव्हान केले व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अन्सारी यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन नरसिंह जोशी यांनी केले तर आणि श्रीमती संध्या द्वासे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी डॉक्टर गरड, उंडरे, हंगरगेकर, बोने, श्री पवार, पाटील, निरज कांबळे, जाधव, हरगुडे, नवटाके, श्रीमती राठोड, काझी, घेवारे, चटके, देशमुख, धोतरे सांजेकर, मोहिते, मैंदाड, श्रीमती कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.यावर्षीचे घोषवाक्य

 “ वेळ निघून जात आहे क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची ” “ The clock is Ticking ”  असे आहे.

 
Top