कळंब / प्रतिनिधी

कळंब तालुका विधिज्ञ मंडळ च्या अतितटीच्या निवडणूकीत  अध्यक्ष पदी  ॲड.मंदार मुळीक तर सचिव पदी ॲड.गणनराज अंभग  यांची निवड झाल्याने न्यायालय परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. 

कळंब येथील न्यायालयातील विधीज्ञ मंडळाची सन २१-२२ या वार्षीक निवडणूक झाली. यात काही पदे बिनविरोध झाली तर अध्यक्ष पदासाठी मात्र दि.२५ रोजी तीन उमेदवारात सरळ लढत झाली ,मतदानात १०० मतदारांपैकी ९६ मतदारांनी आपला मतदानाचा हव्क बजावला होता.मतमोजणी वेळी अध्यक्ष पदा साठी सर्वात जास्त ॲड. मंदार मुळीक यांना मते पडली. या वेळी निवडणूक आधिकारी यांनी अध्यक्ष म्हणून ॲड.मंदार मुळीक यांना अध्यक्ष म्हणून घोषीत केले तर सचिवपदी ॲड.गणराज अभंग,उप अध्यक्षपदी ॲड.विश्वजीत दुगाणे, महिला उपाध्यक्ष पदी ॲड.अर्चना पाटील  व कोष अध्यक्ष पदी ॲड.

 गणेश चव्हाण यांची निवड झाल्याचे घोषीत केले.या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. बाळासाहेब लोमटे ,ॲड.अमरसिंह ढेपे , ॲड.सचिन जाधवर यांनी काम पाहिले . तर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा न्यायालयाच्या आवारात सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने कायदेशीर सल्लागार ॲड.शकुंतला फाटक यांनी सत्कार केला .

 
Top