तुळजापूर / प्रतिनिधी

   बार्शी रस्त्यावर  असणाऱ्या श्रीखंडोबा मंदीर परिसरातील  शेतातील तीन शेतकऱ्यांच्या पाच कडबा गंजीना  आग लागुन यात सुमारे दीड ते दोन  लाख  रुपयांचे अर्थिक नुकसान झाले. ही घटना शनिवार दि. २८ रोजी दुपारी घडली. अखेर तुळजापूर नगरपरिषदच्या अग्नीशमन वाहनांने ही आग विझवुन पुढील मोठी दुर्घटना  टळली. सदरील आग महावितरणच्या जंक्शन मधुन आगीची ठिणगी उडुन लागल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन मधुन केला जात आहे. या जंक्शन प्रकरणी तक्रार येथील शेतकऱ्यांनी दिली होती माञ याची दखल न घेतल्याने ही आगीची घटना घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .

या बाबतीत अधिक माहीती अशी की, बार्शी रोडवर असणाऱ्या श्री खंडोबा मंदीराच्या अलिकडे  अमृतवाडीकडे जाणारा रस्ता असुन येथे संपत हनुमंत काळे, अमृत हनुमंत काळे,  अकुंश ढेरके या तीन शेतकऱ्यांच्या पाच कडब्याचा गंजी होत्या यात जवळपास पंधरा हजाराचा कडबा होता . याला शनिवारी दुपारी आग लागली असता नगरपरिषद वाहन तात्काळ आगीचा घटना स्थळी गेली असता वा-यामुळे आग वाढल्या ने यात पाच कडब्याचा गंजी जळुन भस्मसात होवुन यातीन गरीब शेतकऱ्यांच्या पंधरा हजार कडब्याते पेंड्या जळुन भस्मसात झाल्या यात यांचे जवळपास दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे 

सदरील आग दोन तासाचा अथक प्रयत्नानंतह नगरपरिषद अग्नीशमन दलाला आग विझविण्यात यश आले यासाठी तुळजापूर नगरपरिषद अग्नीशमन दल  फायरमन देविदास नागनाथ देवकते सुनिल सुभाष कदम यांच्या सह त्यांच्या सहकार्याने आग विझवली

 
Top