उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

 जनता कर्फ्यूच्या कालावधीत बेकायदा दारू विक्री करणाऱ्या सहा जणांवर विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा तालुक्यातील एकांेडी (ज.) येथील दत्ता देवेंद्र बिराजदार हा लक्ष्मी फाटा- एकुरगा रस्त्यालगतच्या विटभट्टी येथे देशी दारुच्या २४ बाटल्या अवैधपणे विक्री करत होता. तर हुसन्या अमलया तेलंग (रा. कदेर, ता. उमरगा) पत्रा शेडसमोर १४ लिटर गावठी दारु विकत होता. त्याला उमरगा पथकाने पकडून गुन्हा दाखल केला. बन्सी खुबा चव्हाण (रा. होळी तांडा) हा तांडा परिसरात गावठी दारु विक्री करत होता. तसेच तिरुपती परशुराम उत्तम (रा. कानेगाव, ता. लोहारा) घरासमोर देशी दारुच्या १५ बाटल्या अवैधपणे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून होता. मंगरुळ (ता. कळंब) येथील सिध्देश्वर संभाजी गायकवाड गायरान जागेत गावठी दारु विकताना शिराढोण पोलिसांना आढळला. अंजनसोंडा (ता. भूम) येथील दादा मोटे आपल्या राहत्या घराच्या मागे देशी दारुच्या आठ बाटल्या अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगला होता. तो वाशी पोलिस ठाण्यात पथकास आढळला. त्याच्यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top